Just another WordPress site

हिंगोणा येथे विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोर धरण परिसरातील शेती शिवारात असलेल्या
गट नंबर १२०३ या शेतात शेत मजूर काम करण्यासाठी गेले असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले यामुळे मजुरांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.सदरील बाबीची माहिती शेतात काम करणार्‍यासाठी आलेल्या मजुरांनी तात्काळ शेतमालकाला कळविली.प्रसंगी शेतमालकाने सदरिल माहिती हिंगोणा गावाचे पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना फोनद्वारे दिली.यानंतर हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन खात्री करून सदरच्या घटनेची माहीती फैजपूर पोलीस ठाण्यात दिली.सदरील माहिती मिळताच फैजपूर येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पाणबुड्याच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन देखील घटनास्थळीच करण्यात आले.सदर मृतदेह महिलेचा असून अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकलेली नाही.सदरील महिलेचे वय अंदाजे ४४ वर्ष असुन तिच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आहे.याबाबत फैजपूर पोलीसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देविदास सूरदास हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.