यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
राज्यभरात खेडे असो किंवा शहरी भाग सर्वांना सुखरूप आपल्या गावी आपल्या घरी सोडणारी व महाराष्ट्रच्या नागरीकांच्या दळणवळणाचे एक मोठे साधन म्हणून आज लालपरी (एसटी) कडे बघितले जात आहे.सन् १९४७ मध्ये भारतात ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली व आपल्या राज्यात प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी पब्लीक ट्रासपोर्ट एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.बीएसआरटीसीची पहिली बससेवा १ जुन १९४८ या दिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली त्यावेळी या एसटी बससेवेचे चालक होते तुकाराम पांडुरंग पठारे तर वाहक होते लक्ष्मण कलटे यांनी ही बस चालवली होती.आपल्या राज्यात लाल डब्यापासुन लालपरी असे विविध नावे असलेली एसटी ही सर्वांच्या परिचयाची आहे अशा सर्वांच्या आवडत्या लाल परी आता ७५ वर्षाची झाली आहे.अशा या सर्वांना प्रिय वाटणाऱ्या लालपरीचा ७५ वा वर्धापन दिन यावल आगारात मोठया उत्साहाच्या वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने येथील एस.टी.आगारात आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी एसटीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशी बांधवांना गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले.तर यावेळी प्रवाशांकडून देखील लालपरीच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.प्रसंगी जेष्ठ प्रवाशांच्या हस्ते लालपरीचे पुजन देखील करण्यात आले.यावेळी यावलच्या बसस्थानकावर प्रवाशांच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढून तोरण,फुलहार लावण्यात आले.यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विजय पाटील,वाहतूक निरीक्षक वानखेडे,आगार लेखाकार बारसे,चालक डिगंबर सोनवणे आगारातील पर्यवेक्षकीय कर्मचारी,चालक,वाहक,यांत्रिक कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी,पत्रकार बांधव व प्रवाशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.