Just another WordPress site

महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले ! नंतर ते तुकडे टबमध्ये ठेवल्याचे आढळले !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (३२) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून तिचा लिव्ह इन पार्टनर मनिष साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे तुकडे करून हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकर मध्ये शिजवले आणि गॅसवर भाजले नंतर ते तुकडे बकेट आणि टबमध्ये ठेवल्याचे आढळले असा धक्कादायक खुलासा नुकताच समोर आला आहे. मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते.दि.७ जून बुधवार रोजी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य समोर आले आहे.सुरवातीला पोलिसांना सदरील महिलेचे पाय आढळून आले मात्र तेथे धड आणि शीर नव्हते त्याचा शोध घेतला असता घरातच ते कापून बकेट आणि पातेल्यात ठेवले होते.आरोपी मनीष साने याने सरस्वती वैद्य हिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे केले व ते कुकर मध्ये शिवजले आणि गॅसवर भाजले होते तसेच पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्याने ते घरातील पातेल्यात आणि बादलीत दडवून ठेवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.पाच दिवसांपूर्वी मनीष साने याने ही हत्या केल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज सानेला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचा.अश्याच एका वादानंतर तीन दिवसापूर्वी सरस्वतीने विष पिऊन घरातच आपले जीवन संपवले होते यामुळे तिच्या मृत्यूस आपण कारणीभूत ठरणार असल्याची भीती मनोज याला वाटू  लागली होती त्यामुळे मृत शरीराची परस्पर  विल्हेवाट लावण्यास त्याने सुरुवात केली यात त्याने कटरच्या वापराने तिच्या शरीराचे  तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवले त्यानंतर त्यांना भाजून ते मिक्सरच्या मदतीने बारीक केले व तो राहत असलेल्या सोसायटीच्या मागील गटारात त्याने हे तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे यासाठी त्याने वापरलेले साहित्य आणि बाईक  पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.