यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
तालुक्यातील हिंगोणा येथील खळयात झोपलेल्या बालकास विषारी सापाने दंश केल्याने जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना दि.२० जुलै गुरुवार रोजी घडली असून सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळाली माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथे दरबार बिरलाल बारेला वय ९ वर्ष हा लहानगा बालक आपल्या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबासोबत गावाजवळ असलेल्या वसंत परदेशी यांच्याकडे शेतीकामास असल्याने त्यांच्या खळयात राहात होते. दरम्यान दि.२० जुलै गुरूवार रोजी रात्रीच्या सुमारास खळयात झोपेत असतांना त्याला उजव्या हाताच्या पाठीमागे विषारी सापाने दंश केल्याने तो जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली आहे.याबाबत मयत बालकाच्या नातेवाईवाईकांनी फैजपूर पोलीसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन दरबार बारेला या बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी केले.सदरील घटनेचा पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ राजेश बन्हाटे हे करीत आहे.