Just another WordPress site

यावल येथे महाराष्ट्र ग्रामीण शेड्अल बँकेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जुलै २३ शुक्रवार

येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा १४ वा वर्धापन दिन ग्राहक,शेतकरी व व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

यानिमित्ताने शहरातील नागरीकांच्या तत्पर सेवेशी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण शेड्रअल बँकेचा १४ वा वर्धापन येथील शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बॅंके शाखेतील दालनात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी प्रमोद नेमाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सचे व्यापारी पिन्टू सोनार व यावल शाखेचे व्यवस्थापक हिंगणेकर,सुरेश पाटील,अय्युब पटेल,सुनिल गावडे,तेजस यावलकर,अशोक तायडे यांच्यासह आदी मान्यवर व परिसरातील ग्राहक व शेतकरी बांधव याप्रसंगी उपस्थित होते.दरम्यान १९७६ साली स्थापन झालेली तसेच भारत सरकारचा उपक्रम असलेली व बॅंक ऑफ महाराष्ट्र व्दारा पुरस्कृत असलेली ही बँक पुर्णत: सरकारी मालकीची आहे.विविध बॅंकांच्या एकत्रीकरणातुन २६ जून २००९ पासून अस्तित्वात आलेली असुन महाराष्ट्र राज्यात या बँकेच्या ४२२ शाखा असुन बँकेचा २५००० कोटीचा व्यवसाय आहे.सदरील शाखा वर्धापन दिनानिमित्त विविध विमा योजनेचे श्रीमती चंद्रकला प्रविण तळेले (अपघात विमा),गोविंदा खैरे (अपघात विमा),गोविंदा पोपट माळी (प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा),जितेन्द्र जोहरी (प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा) अशा चार लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी प्रमोद नेमाडे,पिंटू सोनार यांनी आपले विचार मांडले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुधाकर बाउस्कर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.