Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे मूल्यांकन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जुलै २३ शुक्रवार

येथील ग्रामपंचायत कार्यालयात काल दि.२० जुलै गुरुवार रोजी अटल भूजल योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेच्या मूल्यांकनाबाबत मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा स्तरीय समितीमार्फत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे मूल्यांकन करण्यात आले.

सदरील स्पर्धेचे मूल्यांकन पुढील बाबीवर आधारित करण्यात आले.यात प्राथमिक तयारी लोकसहभाग व जनजागृती करणे आणि गाव शिवारातील भूजला बाबतची माहिती संकलित करणे,लोकसभागातून पाण्याचा ताळेबंद जलसुरक्षा आराखडा व पीक नियोजन तयार करणे, समाविष्ट योजनांचे अभिसरण साध्य करणे,पाणी बचतीच्या उपाययोजना राबविणे,नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबविणे,पाऊस पाणी मोजमाप व भूजल पातळी नोंदि विषयक निरीक्षणे करणे,फलनिष्पत्ती पारदर्शकता व जाहीर प्रकटन या प्रमुख मुद्दयावर चर्चा करून पाहणी करण्यात आली.सदर भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे मूल्यांकन जिल्हा स्तरीय समितीमार्फत करण्यात येत आहे.यावेळी जिल्हा समितीचे सचिव वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे नितिन दहिकर,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी भदाणे सर,जिल्हा जलसंधारण विभागाचे जितेंद्र विसपुते,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक विजयंत जैन,कृषी विभाग यावल मंडळ अधिकारी खैरनार साहेब,जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षचे कृषी तज्ञ दीपक कंरकाळ,जलसंधारण तज्ञ धनंजय पॊल, आशाकिरण (DIP) जळगावचे भूवैज्ञानिक आशिष भवाने,IEC तज्ञ रियाज तडवी,समुदाय संघटक तास्लीम तडवी व किरण तावडे उपस्थित होते.सदर बैठकीला ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ तसेच भूजल मित्र उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.