Just another WordPress site

डांभुर्णी येथे कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत महीला उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ सप्टेंबर २३ शनिवार

तालुक्यातील डांभुर्णी येथे महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातुन आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या वतीने उद्योजकता आणि लघुव्यवसाय विकासासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय संस्था,एनआईईएसबीयुडी अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या मार्फत अनेक महिला नव उद्योजकांच्या उपस्थित उद्योजकता विकास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने डांभुर्णी तालुका यावल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मोठया संख्येने  उद्योग व्यवसायासाठी अग्रेसर असलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सदरील कार्यक्रमास बार्टीचे जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी युनुस तडवी यांनी नवउद्योजक निर्माण होतांना येणाऱ्या अडचणी व उद्योग क्षेत्रातील विविध पायऱ्या या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग बार्टी व विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली.या कार्यक्रमास निसबडचे कार्यक्रम अधिकारी विनोद टाक,(निसबड दिल्ली),कार्यक्रम अधिकारी श्रीमती दिपिका शर्मा (निसबड दिल्ली),आसरा मल्टिपर्पज फाॅऊंडेशनचे संचालक राहुल बावीस्कर,उपसंचालक मनोज सोनवणे,कवीर इंटरप्रायजेसचे संचालक निकिता राठोड,समन्वयक कादर तडवी,राहुल निंबाळकर,खैरून तडवी,दोसा अडकमोल,मोना तडवी तसेच तालुक्यातील बहुसंख्येने प्रशिक्षणार्थी महिला मोठया संख्येत उपस्थित होत्या.यावेळी भारत सरकारच्या कौशल्य विकास एंव उद्यमशिलता संकल्प कार्यक्रमाव्दारे दिनांक १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान नवउद्योग व्यवसायिकांना उद्यम आधार प्रमाणपत्र,औषद्य व अन्न प्रमाणपत्र,ऑफीस बॅग,तिन दिवस उद्योग आणि व्यवसायीकांना मार्गदर्शन तसेच मुख्यमंत्री एमआईएसटी या योजने अंतर्गत कर्ज,मुद्रा लोन अशा विविध योजनांचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शन व वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.