मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ नोव्हेंबर २३ शुक्रवार
संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले असून श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करण्यासाठी गेल्या वर्षभर दिल्लीत फेऱ्या मारत आहेत परंतु या खटल्याचा जलदगती न्यायालयात निकाल लागला नाही किंवा पोलिसांच्या तपासातील दिरंगाईबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकानेही काहीच कारवाई केली नाही असा आरोप श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी नुकताच केला आहे.
वसईतील श्रद्धा वालकर ही तरुणी प्रियकर आफताब पूनावाला याच्यासोबत दिल्लीत राहत असतांना मे २०२२ मध्ये आफताबने तिची हत्या करून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे गुरगाव येथील जंगलात फेकून दिले होते.दरम्यान दि.१४ नोव्हेंबर रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती.यात आफताबने जंगलात फेकलेल्या श्रद्धाच्या मृतदेहांच्या तुकडय़ांपैकी १३ अवशेष दिल्ली पोलिसांना मिळून आले आहेत.सदरहू श्रद्धावर अंत्यसंस्कार करायचे असल्याने तिचे वडील विकास मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करत सतत दिल्लीवारी करत आहेत मात्र अद्यापही त्यांना मृतदेहाचे अवशेष मिळालेले नाहीत हि मोठी खेदाची बाब असून मी मागील वर्षभरात स्वखर्चाने २५ हून अधिक वेळा दिल्लीत गेलो आहे.मला जर माझ्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष दिले नाहीत तर मी दिल्लीत बेमुदत उपोषण करणार आहे असा इशाराच विकास वालकर यांनी सरकारला दिला आहे.दरम्यान सदरील श्रद्धा हत्याकांड प्रकरण जलगदती न्यायालयात चालवले जाणार होते मात्र अद्याप न्याय न मिळाल्याने जलगती न्यायालय ही केवळ पोकळ घोषणा होती तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मदतीचे आश्वासन दिले होते परंतु त्यांनीही पाठ फिरवल्याचेही विकास वालकर यांनी म्हटले आहे.