Just another WordPress site

गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंगाचा वापर केल्याप्रकरणी उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार दणका

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंग वापरण्यास परवानगी नसतानाही ते वापरणाऱ्या कोल्हापूरमधील एक आणि सांगली येथील एक अशा दोन गुळ उत्पादकांना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार दणका दिला.या प्रकरणी उत्पादकांना प्रत्येकी पाच-पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच जास्त नफा कमवण्यासाठी गुळ तयार करतेवेळी त्यामध्ये उत्पादक कृत्रिम रंगाचा वापर करत असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.गुळ तयार करताना काही व्यापारी गुळामध्ये साखर,चॉकलेटचा वापर करत असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्याचबरोबर कृत्रिम खाद्यरंगाचा वापरही केला जात आहेत.मुळात अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदीनुसार गुळामध्ये कृत्रिम रंगाच्या वापरास परवानगी नाही.तरी देखील उत्पादक नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे.कृत्रिम रंगामुळे कमी प्रतीचा गुळ उच्च प्रतीचा भासतो.त्यामुळे नागरिक हा गुळ खरेदी करण्याकडे आकर्षित होतात.जास्त नफा कमविण्याच्या लालसेपोटी उत्पादक गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंगाचा वापर करत असल्याची गंभीर बाब अन्न आणि औषध प्रशासनाने गुळाच्या नमुन्यांच्या केलेल्या तपासणीनंतर समोर आली आहे.

   अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोकण विभागाने नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधून गुळांचे काही नमुने तपासणीसाठी घेतले होते. प्रयोगशाळेमध्ये या नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर गुळामध्ये कृत्रिम रंग आढळून आला.विशेष म्हणजे गुळाचा पुरवठा कोल्हापूर आणि सांगली येथून झाला होता.या प्रकरणात नुकतेच एफडीएच्या कोकण विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी कोल्हापूरमधील एक आणि सांगलीमधील एक अशा दोन गुळ उत्पादकांना प्रत्येकी पाच-पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालू वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत १७० प्रकरणे दाखल झाली असून याच कालावधीत १६० प्रकरणे निकालात काढण्यात आली.या प्रकरणात व्यापाऱ्यांना ७० लाखांपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला.अन्न आस्थापना किंवा अन्न पदार्थाचा दर्जा,गुणवत्ता याबाबत कोणतीही शंका असल्यास त्याबाबतची तक्रार प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर करावी असे आवाहन सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.