तुरुंगात असताना मलाही खूप वाईट अनुभव आले आहेत.माझी औषधी माझ्यापर्यंत पोहोचवली जात नव्हती.औषधांसाठी मला झगडावे लागत होते.आमच्या लोकांना आमची औषधी आम्हाला देण्यापासून रोखले जात होते जर आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल तर तुरुंगातील सामान्य कैद्यांची काय अवस्था असेल ? दिल्लीचे माजी मंत्री मनिष सिसोदिया,सत्येंद्र जैन,झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे.राजकीय बदला घेण्यासाठी तुम्ही या लोकांना तुरुंगात टाकले आहे आता किमान त्यांना त्यांची औषधी तरी द्या.आणीबाणीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे अनेक मोठे नेते तुरुंगात होते.माझ्या माहितीप्रमाणे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः वेगवेगळ्या तुरुंगांच्या तुरुंग अधिकाऱ्यांशी बोलायच्या.ज्या ज्या तुरुंगात या नेत्यांना ठेवले होते तिथे त्यांची योग्य व्यवस्था आहे का ते पाहायच्या.त्यांची औषधी,त्यांचे जेवण त्यांना मिळतेय का याची माहिती घ्यायच्या.या नेत्यांच्या सर्व गरजा तुरुंगात पूर्ण होतायत का त्यावर लक्ष ठेवायच्या परंतु देशातले मोदी-शाहांचे खतरनाक आणि सैतानी सरकार असे काही करत नाही व ते मुख्यमंत्र्यांना औषधी मिळू देत नसल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.