भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का ? अशी विचारणा केली असता एकनाथ खडसेंनी त्यावर होकारार्थी प्रतिक्रिया दिली.“नक्कीच.महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण झाले आहे त्याचा फटका भाजपाला बसताना दिसतोय.राज्यभरात फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी अमान्य केले आहे.अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला.उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला.मूळ पक्ष ज्यांचा आहे ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले त्यांच्या हातून ते इतरांच्या हातात जाणे या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे असे एकनाथ खडसे म्हणाले.या प्रकारांमुळेच अजित पवारांना या निवडणुकीत फारसा प्रतिसाद दिसत नसून एकनाथ शिंदेंनाही फारसा प्रतिसाद दिसत नाहीय.उद्धव ठाकरेंचा पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राहील.शरद पवारांच्या १० पैकी ८ किंवा ६ जागा जिंकून येतील असे एक्झिट पोलमध्ये समोर आले आहे अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी भाजपाबरोबरच अजित पवार गट व एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.तर महाराष्ट्रातील एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार महाविकास आघाडी व महायुती यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल त्यात महायुतीने ४० हून अधिक जागांचे दावे केले होते.अजूनही त्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला ३८ ते ४१ जागा मिळतील हा दावा कायम ठेवला आहे मात्र एक्झिट पोलमध्ये महायुतीला २२ ते २५ जागा मिळतील असे अंदाज समोर आले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे हे अपयश असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.