पोलीस उपायुक्त साराह फातिमा यांनी या घटनेबाबत माहिती दिली त्या म्हणाल्या,शुक्रवारी सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली.सामूहिक बलात्काराच्या घटनेत चार जण सामील आहेत व त्यापैकी तिघांना आम्ही अटक केली आहे.फरार आरोपीचा शोध सुरु आहे तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणीही आम्ही केली आहे.शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असे आम्हाला समजले.या प्रकरणाचे तपशील आम्ही घेत आहोत तसेच आरोपींची चौकशीही सुरु आहे.पीडित महिला दिल्लीची आहे.लग्नानंतर ती तिथे राहते असेही फातिमा यांनी सांगितले.ही महिला चांगल्या कुटुंबातील आहे व ती तिच्या मित्राला भेटायला गेली होती त्यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.दरम्यान जानेवारी महिन्यातही अशीच एक घटना घडली होती.बंगळुरुतील होयसला भागात एका बांधकामाच्या ठिकाणी सहा वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करुन तिची हत्या करण्यात आली होती.आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बंगळुरु हादरले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.