Just another WordPress site

यावल येथे शिवसेनेच्या मागणीला यश !! नगरपालिका प्रशासनाने राबविली आवठवडे बाजारात स्वच्छता मोहीम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जून २५ शनिवार

शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनानुसार शुक्रवारी भरणाऱ्या यावल शहरातील आठवडे बाजार संदर्भातील अत्यंत गंभीर समस्याबाबत तिथल्या नागरिकांनी व व्यापारी बांधवांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत सदर समस्या व अडचणींचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.

दरम्यान नागरीकांच्या समस्या मार्गी लागाव्या या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला समस्यांबाबत उपयोजना कराव्या आणि व्यापारी वर्ग बाजार करणाऱ्या महिला व पुरुष यांच्या गंभीर समस्या तसेच अत्यंत दुर्गंधी व अस्वच्छता या संदर्भात यावल नगरपालिका प्रशिक्षणाला शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.यावल नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी निशिकांत गवई यांची भेट घेऊन तात्काळ उपयोजना करावी अशी ठाम मागणी शिवसेनेने लावून धरली होती.याची प्रशासनाने दखल घेत तात्काळ संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत अधिकाऱ्यांना तिथल्या समस्या जाणुन घेत तात्काळ त्याच दिवशी त्या क्षणाचाही विना विलंब लावता अधिकाऱ्यांनी त्वरीत स्वच्छता मोहीम राबवित आठवडे बाजार परिसर स्वच्छ केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार,शिवसेना युवा शाखेचे प्रमुख अजय तायडे व त्यांच्या सहकार्यांचे कौत्तुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.