यावलकरांच्या नशीबी आलेले जिर्ण जुनाट बसस्थानक व भंगार बस गाड्यांच्या प्रवासातुन सुटका कधी होणार ? प्रवाशी वर्गातून प्रश्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ ऑक्टोबर २५ शुक्रवार
जिर्ण झालेली बसस्थानकाची ईमारात व भंगार झालेल्या एस टी बसेस असे यावल आगाराच्या रूपात यावलकरांना मिळालेले हे प्रवासाचे वनवास कधी संपणार ? या प्रश्नाच्या चक्रव्यूहात प्रवासी नागरीक भरडला जात असून राज्य एसटी महामंडळाने व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न पडत आहे.
जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्व बसस्थानकांच्या ईमारतीचे नुतनी करण गेल्या मागील पाच वर्षात यावल बसस्थानक वगळता पुर्ण झालेले आहे.तिन लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या या आदिवासी क्षेत्राच्या प्रवासी हितासाठी लढा देणाऱ्या विविध सामाजीक संस्थांनी यावलच्या जुनाट व जिर्ण झालेल्या ईमारतीचे नुतनीकरण व्हावे अशा मागण्या केलेल्या असून या प्रवासांशी निगडीत प्रश्नाकडे शासनाने किंवा एसटी महामंडळाने लक्ष दिलेले नसल्याने आज ही हा प्रश्न प्रलंबित आहे.दरम्यान यावल बस आगारात प्रवासी वाहतुक करणाऱ्या जवळपास सर्वच एसटी बसेस अतिश्य व भंगार जमा झालेल्या असुन या नादुस्त व भंगार झालेल्या एसटी बस गाडयांमध्येच प्रवासांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.या नादुस्त भंगार बसगाडयांचे लांब पल्यांच्या मार्गावर अनेक वेळा बस बिघाड होणे,ब्रेक निकामी होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवासांचे हाल होतांना दिसत आहे.सुदैवाने या यावल आगारातील बसगाडयांचे मोठे अपघात होत नाही अन्यथा या अपघातातुन मोठी जिवीतहानी होवु शकते.सदरहू भंगार एसटी बसेस असतांनाही यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक हे अशा बिकट अवस्थेत देखील महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी तारेवरची कसरत करीत परिश्रम घेत असल्याचे दिसुन येत आहे.लोकप्रतिनिधी यांनी व महामंडळाने वेळीच दखल घेवुन यावल आगारास गरजेनुसार बसगाडया उपलब्ध करून द्यावे व बस स्थानकाच्या ईमारतीचे नुतनीकरण तात्काळ करावे अशी मागणी प्रवासी नागरीक करीत आहे.