Just another WordPress site

यावल येथील साने गुरुजी विद्यालयाचे प्रवेशव्दार पूर्वरत करण्यात यावे !! अन्यथा आंदोलन करण्याचा भाजपा नगरसेवक योगेश चौधरी यांचा इशारा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ फेब्रुवारी २६ गुरुवार

येथील नगरपालिका प्रशासनाअंतर्गत असलेल्या साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात नवीन ठीकाणी मागच्या बाजूस प्रवेशव्दार उभारण्यात आले असुन सदरचे प्रवेशव्दार विद्यार्थी यांच्या सोईनुसार नसून मुलींची गैरसोय व गैरप्रकार होत आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने पुर्वीचे समोरील बाजूस जुने प्रवेशव्दार पुनश्च सुरू करण्यात यावे अन्यथा जुने प्रवेशद्वार न झाल्यास लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा ईशारा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक योगेश चौधरी यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे.

दरम्यान नगरपालिका प्रशासनाने पुर्वीचे समोरील बाजूस जुने प्रवेशव्दार पुनश्च सुरू करण्यात यावे व जेणे करून विद्यार्थीनीवर गैरप्रकार होणार नाही यासाठी नगरपालिका प्रशासनाने पालकांना व वि‌द्यार्थ्यांना सहकार्य करावे व विद्यार्थीनींची काळजी घ्यावी आणी त्वरीत पूर्वीचे प्रवेशव्दार पूनश्च सुरू करावे अशी मागणी केली आहे.सदरहू जुने प्रवेशद्वार न झाल्यास लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा ईशारा भाजपा नगरसेवक योगेश चौधरी यांनी गट शिक्षणधिकारी व मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला असुन निवेदन प्रसंगी योगेश चौधरी यांच्या समवेत चेतन अढळकर,रोशन येवले,अतुल चौधरी,मुकेश कोळी,व्यंकटेश बारी,नितीन बारी,रितेश बारी,उज्वल कानडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.