यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ मार्च २६ शनिवार
ह्यूमन पेपिलोमा व्हायरस,(एचपी व्ही) या लसीकरण मोहिमेबाबत जनसामान्य नागरीकांमध्ये उडणाऱ्या अफवांच्या माध्यमातुन गैरसमज निर्माण असल्याबाबत जनजागृती व मार्गदर्शक प्रणाली प्रसारित करून योग्य संदेश देणेबाबत कारण अमेरिकेकडून धोक्याच्या इशारा असल्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातुन माहिती प्रसारित होत आहे तरी शासनाच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अप ) च्या वतीने यावलच्या तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आले.
दरम्यान २०२२ या वर्षाच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ३४८०५ मृत्यू पेपिलोमा वायरस हा एक प्रकारचा विषाणू असून याच्या संसर्गामुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग सर्वायवल कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.तरी हा एकमेव आजार असून जो लसीकरणाद्वारे टाळता येवु शकतो पण सध्या सोशल मीडियावर याबाबत चुकीची माहिती प्रसारित होत असून या लसीमुळे वंदत्व गर्भपात किंवा जन्मदोष होऊ शकते अशाप्रकारे माहिती ही सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.तरी याबाबत मुलीच्या भवितव्याच्या प्रश्नावर हा महत्त्वाचा विषय असल्याबाबत तहसीलदार यावल यांना याबाबत विचारणा केली व याबाबत आपण ठोस माहिती प्रसारित करून याबाबत आपण माहितीपत्र तसेच याबाबत तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधीक्षक यांना तातडीने लोक जनजागृती करावी माहिती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी यावल नगर परिषदच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अप)च्या गटनेत्या वर्षा चोपडे,युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आकाश चोपडे,युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील,शहराध्यक्ष योगेश पाटील,प्रेम देवरे,गोलु महाजन,किरण महाजन,रोहित महाजन,जुनेद खान,अल्तमस शेख व आदि कार्यकर्तें उपस्थित होते.