ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दहिगाव येथील १ कोटी रुपयांची जलजिवन मिशन योजना दोन वर्षापासून कोरडी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ मार्च २६ शनिवार
तालुक्यातील दहिगाव येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलकुंभ व पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीचे काम मागील एक वर्षा पासून रखडले असल्याने जलकुंभाचे काम करणारा ठेकेदार व या कामाशी संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याबाबत ग्रामस्थांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.परिणामी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी संबधीत ठेकेदाराची मनमानी थांबवावी आणि त्याला समज द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दरम्यान गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी दहिगाव येथील पाणीपुरवठ्याकरिता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी चार लाख रुपये मंजूर झालेले गेल्या वर्षी या कामाला प्रारंभ करण्यात आला मात्र मोजके काम करून ठेकेदाराने हे काम बंद ठेवलेले आहे.पाईपलाईन वगळता इतर कामे रखडली असल्याने तसेच पाईपलाईनही अपूर्ण असल्याने गाव पातळीवर पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.गावात पाणीपुरवठा रात्री दिवसा वीज कंपनीच्या लोड सेडींग अनुसार केला जात असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्याला ५० टक्के ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने गावातील ग्रामस्थ पाण्याच्या शोधात दिसून येतात.जलजिवन मिशन म्हणजे काय तर जल जीवन मिशन ही भारत सरकारची महत्वाची योजना आहे.याचा उद्देश प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी (Har Ghar Jal) उपलब्ध करून देणे आहे.जलजीवन मिशन अंतर्गत घराघरात नळ योजना राबवणे प्रामुख्याने उद्देश आहे मात्र तो ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर उपक्रम बंद पडलेल्या स्थितीत आहे.सदरहू याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधित ठेकेदारास समाज देऊन काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.जलजीवन मिशन योजना अंतर्गत गावाकरिता एक कोटी चार लाख रुपये मंजूर झालेले आहेत ठेकेदाराने हे काम पाईपलाईन पाण्याची टाकी व इतर सर्व कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद केलेली आहेत.शासनाकडून पैसा मिळत नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे काम लवकरात लवकर करावी अशी आमची अपेक्षा आहे असे सरपंच अजय अडकमोल यांनी सांगितले आहे.