Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे १ मे ते १५ मे २६ याकालावधीत बालसंस्कार शिबीराचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७एप्रिल २६ मंगळवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे

ह.भ.प. काशिनाथ महाराज कोळन्हावी

ह.भ.प.भरत महाराज बेळीकर,ह.भ.प.धनराज महाराज अंजाळे,महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज फैजपूर,ह.भ.प.दिनकर महाराज,डो.कठोरा ह.भ.प.दत्तात्रय महाराज,डो.कठोरा यांच्या आशीर्वादाने दि.१ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत आदिशक्ती मुक्ताई बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात भगवत गीता पठण,मंत्र ध्यान,किर्तन,धर्म,गायन,मृदंग,काकडा व हरीपाठ इ.बाबत ज्ञानार्जन करण्यात येणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून अमोल हरीभाऊ जावळे,आमदार रावेर- यावल,जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे,वढोदा हे राहणार आहेत.

दरम्यान शिबिरादरम्यान सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुलींनी घरुन येतांना ग्लास,ताट,अंथरुण,पांघरुण सोबत आणावे तसेच ज्या मुलांना मृदंग शिकायचा असेल त्यांनी मृदंग सोबत आणावे.सदर शिबिरात कोणत्याही मुला-मुलीकडुन कोणतीही फि घेतली जाणार नसून प्रवेश पूर्णतः निशुल्क आहे तसेच कुठलीही वयाची अट ठेवण्यात आलेली नाही.दि.१५ मे २६ या शिबीर समाप्तीच्या दिवशी दुपारी १० ते १२ काल्याचे किर्तन,१२ ते ५ महाप्रसाद व संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत दिंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदरील कार्यक्रमादरम्यानचे संत भोजन हे मनोहर इच्छाराम झांबरे,इच्छाराम सुकाराम बाऊस्कर,रविंद्र मुरलीधर पाटील,नितीन भास्कर पाटील, जितेंद्र जानकीराम पाटील,पवन दामोदर भारंबे,प्रविण दिनकर गाजरे,सुनिल मुरलीधर झांबरे,मरीअम फयाज पिंजारी,शोभा रमेश पाटील कुसुंबा अंगणवाडी सुपरवायझर,सुधाकर देवराम सावळे,सुरेश सिताराम सरोदे,सुरेश मधुकर चौधरी,सुरेश वासुदेव भिरुड,संदिप खाचणे विरोदा,प्रविणदादा वारके विरोदा,सुभाष त्रंबक आढाळे,फिरोज इस्माईल तडवी,सुरेश मावजी बाऊस्कर,अमोल प्रकाश फिरके,कै.पंकज मुरलीधर राणे यांचे स्मरणार्थ सचीन मुरलीधर राणे यांचेकडुन तसेच वै.जगन्नाथ हरी पाटील यांचे स्मरणार्थ नितीन जगन्नाथ पाटील यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम राहणार आहे.सदर कार्यक्रमात ह.भ.प.वैभव महाराज,ह.भ.प.उदय महाराज,ह.भ.प.रविंद्र महाराज,ह.भ.प.कुंदन महाराज,ह.भ.प.प्रविण महाराज,ह.भ.प.भरत महाराज,हेमंत सुपडू धनगर,दिलीप देवीदास झोपे दुध डेअरी,सुभाष सोमा कोलते,सुरेश कळसकर,जय भवानी डिजे साऊंड डो.कठोरा व समस्त गावकरी यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी सदरील शिबीर कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्त गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक  ह.भ.प.खुशाल महाराज व ह.भ.प.दिनेश महाराज यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.