Just another WordPress site

यावल पश्चिम वनविभागाच्या कारवाईत विनापरवाना सागवान पाटयांची वाहतुक करणारे वाहन जप्त !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ एप्रिल २६ सोमवार

यावल पश्चिम वन परिक्षेत्र विभागाने केलेल्या धडक कारवाईत विनापरवाना चोरटया मार्गाने सागवान जातीच्या पाटयाची वाहतुक करतांना चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून पश्चिम क्षेत्रातील नायगाव-किनगाव रस्त्यावर रात्री १० वाजताचे सुमारास दबा धरून बसलो असता महिंद्रा पिकअप क्रमांक एमएच ०४ ईएल ७६५८ गाडीची तपासणी केली असता प्लास्टिक करेटचे खाली विनापरवाना साग चौपाट नग ८ घनमिटर ०.१७७ माल किंमत ३९३९/-चे मिळून आले व वाहनाची किंमत ५,२५००० / रु असा एकूण ५२८९३९ /-चा मुद्देमाल जप्त केला.गाडीचा वाहन चालक हा वाहन सोडून फरार झाला.सदर वाहन मुद्देमालासह घटनास्थळावरून जप्त करून शासकीय काष्ठ आगार यावल येथे जमा केली आहे.त्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल यांनी प्रथम रिपोर्ट क्रमांक ०६/२०२६,दि.११ एप्रील २०२६ चा जारी केला.भारतीय वन अधिनियम१९२७ चे कलम ४१ (२) ब.अन्वये नोंदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही सौरिष सहाय उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव,समाधान पाटील सहाय्यक वन संरक्षक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कार्यवाही प्रशांत जोशी (वनपरीक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम ),वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल विपुल पाटील,वनपरिमंडळ अधिकारी वाघझिरा संजय इंडे,वन परिमंडळ अधिकारी हरीपुरा,वनरक्षक हनुमंत सोनवणे,चेतन शेलार,अक्षय रोकडे,इंदल चव्हाण,मोहन कच्छवाह,आनंद तेली,श्रीमती सरला भोंगरे,श्रीमती सीमा भालेराव यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.