Just another WordPress site

राहुल जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी ) :-

दि.१७ एप्रिल २६ शुक्रवार

पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी.के.आरिकर यांच्या आदेशाने तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव भालेराव (पत्रकार),उत्तर महाराष्ट्र सचिव व भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा.योगेश गोसावी तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते राहुल जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

दरम्यान राहुल जयकर हे पर्यावरण संवर्धन,वृक्षारोपण,जैवविविधता जतन तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.त्यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण व विकासाशी संबंधित विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था,पर्यावरणप्रेमी नागरिक व पत्रकार बांधवांकडून राहुल जयकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.भविष्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड,पाणी संवर्धन तसेच जनजागृतीसाठी व्यापक स्तरावर उपक्रम राबविण्याचा मानस राहुल जयकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.