“शासनाच्या योजना प्रत्यक्ष नागरीकांपर्यंत पोहचाव्यात हाच अभियानाचा उद्देश” !! तहसीलदार मोहनमाला नाझीरकर
किनगाव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दरम्यान नागरिकांनी व्यक्त केले समाधान !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१८ एप्रिल २६ शनिवार
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” काल दि.१७ रोजी किनगाव येथे उत्साहात संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीमती. मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी “शासनाच्या योजना प्रत्यक्ष नागरीकांपर्यंत पोहचाव्यात हाच अभियानाचा उद्देश” असल्याची भावना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी व्यक्त केली.सदर योजनेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबीरात जिवंत सातबारा वाटप,११४वारस नोंदी,२१ प्रातिनिधिक वाटप,९ उत्पन्न दाखले,१३ शिधापत्रिका,३ जात प्रमाणपत्र,तुकडा शेरा कमी करणे (७/१२ उतारा व आदेश) ८८२ तुकडा सातबारा ६९४ पात्र प्रकरणे १७ प्रातिनिधिक,अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र ५ विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी ८ लक्ष्मी मुक्ती सातबारा १ आदिवासी खातेदार नोंदी ४ घरकुल लाभ २ आयुष्मान कार्ड (आरोग्य विभाग) १६ व १ ट्रॅक्टर इ.वाटप करण्यात आले.या अभियानासाठी कृषी विभाग,पंचायत समिती,आरोग्य विभाग,पशु वैद्यकीय विभाग,महिला व बाल कल्याण विभाग,संजय गांधी,इंदिरा गांधी योजना,भुमी अभिलेख इ.विभागांच्या आधिकारी व कर्मचारी यांनी नागरीकांच्या समस्यांचे निराकरण केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी,सुनिल नेवे,दिनेश साळुंके,पो.पा.अशोक पाटील,सचिन नायदे,सुरेश पाटील,किशोर देवरे,भरत चौधरी,पुरुषोत्तम महाजन,जनार्दन कोळी,एन.आर.पाटील,डिगंबर सपकाळे,प्रशांत दुसाने इ.सह परिसरात परीसरातील नागरीक व निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार यांची विशेष उपस्थीती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी केले तर या कार्यक्रमास यशस्वीतेसाठी किनगाव मंडळ अधिकारी सलमान तडवी,तलाठी मधुकर खुर्दा,भूषण सूर्यवंशी,अमित राऊत,छाया झटके,खुशबू तडवी,महसूल सेवक गणेश वराडे,ज्ञानेश्वर सोळंके यांनी परीश्रम घेतले.