Just another WordPress site

किनगावजवळ क्रुझर व दुचाकीच्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू !! विदगाव येथे शासकिय इतमामात अंतसंस्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ एप्रिल २६ बुधवार

तालुक्यातील किनगावहून दुचाकी वाहनाने यावलकडे येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा हॉटेल मन मंदिराच्या समोर भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीस मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.सदर पोलिसावर विदगाव ता.जळगाव येथे जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या उपस्थितीत शासकिय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले.तर या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान किनगाव ता.यावल या गावातून यावल येणाऱ्या रस्त्यावर अंकलेश्वर बऱ्हाणपुर राज्य मार्गावरील हॉटेल मनमंदिराच्या समोरून दि.९ एप्रिल रोजी रात्री भरत विठ्ठल कोळी वय ३८ हा यावल येथील पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हे दुचाकी क्रमांक एम.एच.१९ सी.जी.२८१३ द्वारे विदगाव येथुन किनगावमार्गे यावल येत होता.दरम्यान भरधाव वेगात मागून क्रुझर चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.२९ बी.सी. ५४८७ घेऊन चालक दीपक प्रकाश सपकाळे रा.आडगाव तालुका यावल याच्या ताब्यातील वाहनाने भरधाव वेगात मागुन दुचाकीस जबर धडक दिली यात दुचाकीस्वार भरत कोळी हा पोलिस हवलदार जखमी झाला.जखमी अवस्थेत त्याला उपचारा करिता जळगाव नेण्यात आले.खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपवचार सुरू होते,उपचारा दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास जख्मी पोलीस कर्मचारी याचा मृत्यू झाला. विदगाव तालुका जिल्हा जळगाव येथे सोमवारी दुपारी भरत कोळी यांच्यावर त्यांच्या गावात शासकिय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधिक्षक संदिप गावीत,नितिन गणापुरे डीवायएसपी जळगाव,फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर,पोलिस निरिक्षक यावल रंगनाथ धारबळे,पोलिस निरिक्षक तालुका पोलिस स्टेशन जळगावचे शशीकांत पाटील सह अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयातील मानवंदना देणारे पथकाकडून हवेत रायफलच्या फेऱ्या झाडून सन्मान देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.