यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ मे २६ शनिवार
तालुक्यातील आदिवासी गाव सौखेडा सिम येथील सुपुत्र हारून रूबाब तडवी यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर मजल मारली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हारून तडवी हे सध्या पुणे येथे राज्य राखीव पोलिस दल (SRPF) मध्ये आपले कर्तव्य बजावत असून नोकरी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि “PSI होणारच” या दृढ निश्चयाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हारून यांनी स्वतःचा वेगळा मार्ग तयार केला.त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे.हारून तडवी यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून तसेच समाज बांधवांकडून आणि मित्र परिवाराच्या माध्यमातुन व नातेवाईकांकडून तडवी यांच्यावर अभिनंदना चा वर्षाव होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त करत “हारूनच्या जिद्दीमुळेच हे यश शक्य झाले,” अशी भावना व्यक्त केली.हारून तडवी यांनी मिळवलेले यश हे केवळ लक्ष वेधणारे असून ग्रामीण क्षेत्रातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर यश निश्चित मिळते,” हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.