यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.९ मे २६ शनिवार
माध्यमिक शालांत परीक्षेचा सन २०२६ चा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते व हे सर्व ३० विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाले व स्कूलची १५ वर्षांची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.
यात मोहित पाटील ८७% गुण मिळवून प्रथम तर नयन पाटील ८५.२० % गुण मिळवून व्दितीय,पृथ्ली सोनार ८४.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश संपादन केले.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,व्हा.चेअरमन शैलेजा विजयकुमार पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंह पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव व इ.१० वीचे वर्गशिक्षक मिलिंद भालेराव इ.सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.