Just another WordPress site

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल पंपधारकांसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून मार्गदर्शक सुचना जारी !!

जळगाव-पोलीस नायक

दि.२१ मे २६ गुरुवार

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल पंपावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून नुकत्याच मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आली असून याबाबत

जिल्ह्याभरातील बी.पी.सी.एल,एच.पी.सी.एल,आय.ओ.सी.एल,नायरा रिलायन्स पेट्रोलियम कंपनी यांच्या पेट्रोल पंप मालकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की,सध्या उद्भवलेल्या आखाती युद्धाच्या (Gulf War) परिस्थितीमुळे देशांमधील सद्यस्थितीमुळे इंधन टंचाई निर्माण होईल अशा आशयाच्या अफवा पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम अधिनियम 1934 व नियम 2002 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत जिल्ह्याचा इंधन पुरवठा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.दरम्यान पेट्रोल व डिझेल पंपधारकांसाठी देण्यात आलेल्या सूचना सूचना पुढीलप्रमाणे आहेत.यात पुरवठा खंडित करू नका,पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून  तांत्रिक कारणाशिवाय किंवा साठा संपल्याशिवाय ‘नो स्टॉक’ (No Stock) चे फलक लावू नये,पेट्रोल व डिझेल विक्री करतांना ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या बॉटलमध्ये व कॅनमध्ये पेट्रोल व डिझेल या इंधनाचे वितरण करण्यात येवू नये तसेच साठेबाजी करणा-यावर विशेष लक्ष द्यावे.साठेबाजीवर बंदी घालण्यात यावी व कोणत्याही पंपधारकाने जाणीवपूर्वक साठा करून ठेवू नये.सदरहू साठा असूनही विक्री नाकारल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.पंपावर गर्दी झाल्यास वाहनांच्या रांगांचे योग्य नियोजन करावे जेणेकरून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही.पेट्रोलियम कायद्यानुसार पंपावर अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवावी आणि वाढत्या गर्दीत सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी.

ग्राहकांसाठी (नागरिकांसाठी) सूचना व आवाहन

पॅनिक बायिंग (Panic Buying) टाळा,जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे.नागरिकांनी घाबरून जाऊन वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेणे किंवा घरामध्ये डब्यांमध्ये,कॅनमध्ये साठा करणे टाळावे.धोकादायक साठवणूक टाळा,घरामध्ये किंवा दुकानात अनधिकृतपणे पेट्रोल-डिझेलची साठवणूक करणे हे पेट्रोलियम कायदा 1934 नुसार गुन्हा असून ते अत्यंत अग्निशय आणि जीवघेणे ठरू शकते.अफवांवर विश्वास ठेवू नका,सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते पुढे पाठवू नका.अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.जिल्ह्यातील पुरवठा विभागामार्फत सर्व पंपांच्या साठ्याची तपासणी केली जात आहे जर कोणीही व्यावसायिक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा परवाना रद्द करण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येईल.नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे.वरील सर्व बाबीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व वरील दिलेल्या सुचनांचे उल्लंघन करणा-या पेट्रोल,डिझेल पंपधारकावर जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 व पेट्रोलियम अधिनियम 1934 व नियम 2002 नुसार पुढील आवश्यकती कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नमूद केले आहे.

जळगांव

Leave A Reply

Your email address will not be published.