Just another WordPress site

यावल हरिता-सरीता नदी पुलावर सुरक्षा कठडे नसल्याने अपघातास आमंत्रण !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ मे २६ रविवार

येथील हरिता सरीता नदीच्या पात्रात बांधलेल्या पुलावर कठडे नसल्याने या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

यावल शहराला लागुन असलेल्या हरिता सरीता नदीच्या पात्रात गेल्या काही वर्षा पासून बांधलेल्या पुलावर वाहतुकीला व पादचाऱ्यांना सुरक्षा देणारे कठडे नसल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता असून या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत गरजे आहे.दरम्यान या पुलावरून विद्यालय,  बालवाडी,लहान मुलांची शाळा,शासकीय आयटीआय आणी सूतगिरणी अशा विविध महत्वाच्या ठीकाणी शाळकरी,विद्यालयाचे विद्यार्थ्यानी व आयटीआय व सुतगिरणी च्या कर्मचाऱ्यांची वर्दळ असते.या पुलावर कठडे नसल्याने पावसात या पुलावर मोठया प्रमाणावर धोका निर्माण झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने भविष्यातील संभाव्य मोठी घटना व जिवित हानी टाळण्यासाठी तात्काळ या पुलावर कठडे बांधावे अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.