यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ जुलै २६ गुरुवार
तालुक्यातील नायगाव येथील माहेरवासीनी व कापडणे (धुळे) येथील सासर असलेल्या छाया कैलास भामरे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे.सदरहू छाया भामरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्हि.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते नुकतीच पदवी प्रदान करण्यात आली.छाया भामरे या नायगाव येथील भगवान बंडू पाटील यांच्या कन्या असून त्यांना भौतिकशास्त्र (Physics) विषयातील विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी मिळाली त्यांनी Study of Dielectric and Emission Characteristics of Soils and Their Nutrient Management at Microwave Frequencieis” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला.सदरील संशोधनामध्ये जळगाव जिल्ह्यातील मातीच्या डायलेक्ट्रिक व उत्सर्जन गुणधर्मांचा मायक्रोवेव्ह वारंवारितींवर अभ्यास करून पोषण व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
या संशोधनाचे पी.एच.डी प्रबंध कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विज्ञान विद्याशाखेअंतर्गत भौतिकशास्त्र विषयात सादर केला.यासाठी त्यांना जयहिंद एज्युकेशनल ट्रस्टच्या झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे येथील मायक्रोवेव्ह रिसर्च लॅबोरेटरीचे प्राध्यापक व सध्या नाशिक येथे कार्यरत असलेले डॉ.प्रवीण रघुनाथ चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.छाया कैलास पाटील यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे नायगाव ता.यावलसह कापडणे ता.धुळे येथे कौतूक होत आहे.त्या पंकज व जयवंत पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांच्या भगिनी आहेत.