यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यात शिवसेना(ठाकरे),राष्ट्रवादी पक्ष व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढविण्यात आलेल्या कसबा मतदार संघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करीत त्यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल यावल तालुका महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहरातील बुरूज चौकात फटाके फोडुन जल्लोष साजरा केला.
यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील,यावल शेतकी सहकारी संघ चेअरमन अमोल भिरूड,काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान,वढोदे सरपंच संदीप सोनवणे,शिवसेनेचे शरद कोळी,संतोष खर्चे,नगरसेवक मनोहर सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस फैजपूर अध्यक्ष अन्वर खाटीक,युवक राष्ट्रवादीचे देवकांत पाटील,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष फैजान शाह,राष्ट्रवादीचे करीम चौधरी,शिवसेनेचे विवेक अडकमोल,काँग्रेस तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,विवेक सोनार,काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,काँग्रेस आदीवासी विभागाचे बशिर तडवी,अमर कोळी, शेख नईम,विक्की सोनवणे,निसार भाई,अशपाक शाह,सरफराज शाह,सागर देवांग,मोहसिन खान,फारूक मुंशी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.