Just another WordPress site

यावल महाविद्यालयात कृषी विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावल कृषी विभागातील कृषी विषयक जनजागृती कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमाला यावल तालुका कृषी अधिकारी एस.बी.सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास बारेला व एम.एस.मिटके यांनी महा विद्यालया तील युवतींना शेती विषयक मार्गदर्शन केले.कैलास बारेला यांनी पोषण आहाराविषयी व तृणधान्य वापरावर मार्गदर्शन केले.तर कृषी सहाय्यक एस.बी.मिटके यांनी कृषी विषयक विविध योजना कृषी अवजारे तसेच सेंद्रिय शेती या विषयांवर माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विषमुक्त आहार व त्याचे महत्त्व पटवून दिले.यावेळी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एस पी कापडे उपस्थित होते.तर कार्यक्रम यशस्वितेकरिता डॉ.अनिल पाटील,डॉ.संतोष जाधव,प्रा.कामडी,प्रा सौ.पवार,प्रा.कोष्टी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.मोरे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी अहिरे यांनी तर आभार प्राची पाटील हिने मानले.प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.