राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असून ते भाजपाच्या वाटेवर आहेत असेही म्हटले जात आहे परंतु अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सत्तांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.मात्र असे असताना आता आशिष शेलारांनी अजित पवारांच्या नाराजीवर व महाराष्ट्राच्या सत्तांतरावर प्रतिक्रिया दिली असून दिल्लीत अमित शाहांबरोबर महाराष्ट्राच्या सत्तांतरावर काय चर्चा झाली?ते मी उघड करू शकत नाही असे विधान आशिष शेलार यांनी केले असल्याने त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तर्क-वितर्क लावले जात आहेत.अजित पवार भाजपाबरोबर येतील असे वाटतेय का?या प्रश्नाला उत्तर देतांनाआशिष शेलार म्हणाले की,मला वाटते की,याबाबत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करायला हवी त्यामुळे असा प्रश्न भाजपाला विचारणे चुकीचे आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय सुरू आहे?हे त्यांनाच माहीत आहे.अजित पवारांना काय निर्णय घ्यायचाय तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे व तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे.भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात जनतेची सेवा करत असून सरकार खंबीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांनी अलीकडेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल काही चर्चा झाली का?असे विचारले असता आशिष शेलार म्हणाले की,केंद्रीय स्तरावर जर काही चर्चा असेल तर ती सार्वजनिक करण्याचा विषयच येत नाही व तो मला अधिकारही नाही परंतु राजकारणात काहीही घडू शकते असे आशिष शेलार यांनी ‘टीव्ही ९ मराठी”शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली असल्याने यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.