ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला असून काल दि.२ जून २३ शुक्रवार रोजी रात्री हा अपघात झाला आहे.कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला आहे.या अपघातातील मृतांची संख्या २३३ इतकी झाली असून ९०० प्रवासी जखमी झाले आहेत अशी माहिती एएनआयने दिली आहे.सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचे समोर आले होते त्यानंतर ही ५० झाली आता एएनआयने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २३३ इतकी झाली आहे.अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघातस्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे.बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या,रडणे,हुंदके,जखमी लोक सगळे रात्रभर त्या परिसरात होते.एनडीआरएफने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला.आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे.आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.
काल शुक्रवारी झालेल्या या भीषण रेल्वे अपघातानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसाचा दुखवटा राज्यात जाहीर केला असून ३ जून या दिवशी ओडिशात कुठलाही उत्सव किंवा तसा कार्यक्रम सादर केला जाणार नाही असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरले त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली.जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असेही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटले आहे.यावेळी हावडा मेलचीही टक्कर या दरम्यान झाली असून एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे.कटक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्समध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे.जखमींना रक्ताची गरज आहे त्यामुळे जखमींना रक्तदान करण्यासाठीही आवाहन केले जात आहे त्यानंतर जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि भद्रक या ठिकाणी अनेक रक्तदातेही जखमींना रक्त द्यायला आले होते.ओडिशामध्ये जो अपघात झाला त्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत जाहीर करण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने केली आहे.