यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ एप्रिल २४ शनिवार
शहरात नगर परिषद कार्यक्षेत्रातील विस्तारित वसाहतीमधील विविध भागात गटारी व नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असुन यामुळे या परिसरात डासांचा उपद्रव वाढला असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.याकडे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवुन घाणीचे साम्राज्य संपुष्टात आणावे अशी मागणी होत आहे.
यावल शहरातील विस्तारीत झालेल्या फालक नगर,आयशानगर,चांदनगर,पांडूरंग सराफ नगर व अन्य कार्यक्षेत्रात विविध ठिकाणीच्या गटारी या दुर्गंधीयुक्त घाणीच्या पाण्याने व कचऱ्याने तुंबुन भरलेल्या असून या गटारींची सफाई न झाल्याने त्या ठीकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने डासांचा उपद्रव वाढवा असुन यामुळे नागरीकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.दरम्यान आयशानगरच्या आयशा मस्जिदच्या बाजुने असलेल्या मोठया नाल्यात गेल्या अनेक दिवसांपासुन दुर्गंधीचा कचरा साचल्याने घाणीचे पाणी वाहण्यास अडचण निर्माण होवुन या ठीकाणी नमाज पठणासाठी येणाऱ्या नागरीकांना व परिसरातील राहणाऱ्या नागरीकांना या दुर्गंधी सामना करावा लागत आहे.पावसाळा एका महीन्यावर येवुन ठेपला असुन पावसाळ्या आधी जर हा नाला व गटारीची सफाई न झाल्यास नागरीकांना अनेक आरोग्या विषयी समस्यांना सामोरे जावे लागेल.तरी नगर परिषदेच्या आरोग्य प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेवुन पावसाळ्या आधी सदरील नाला व गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात आली आहे.