यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ मे २६ रविवार
खवय्ये ग्राहकांच्या सेवेत शुद्ध स्वादिष्ठ फराळ व मिठाई देण्याची परंपरा राजस्थानी बांधवानी गेल्या अनेक वर्षा पासुन जपुन ठेवली आहे व ती आज ही कायम आहे असे मनोगत यावल येथे नव्याने ग्राहकांच्या सेवेत रुजु झालेल्या ५६ भोग स्विट्स मिठाई दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे टी महाजन व्यापारी संकुलनात सुरु झालेल्या या ५६ भोग स्विट्स या मिठाई दुकानाचे उदघाटन यावल शहराच्या नगराध्यक्ष छाया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्जैनसिंग राजपुत,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील,नगर पालीका भाजपा गटनेत्या नंदा महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे अॅड देवकांत पाटील,राकेश सोनार,कदीर खान यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मिठाई दुकानचे मालक हरिसिंह राजपुरोहीत यांनी केले .