बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर किनगाव जवळील लव्हाळ नाल्यावरील पुलावर कठडे नसल्याने ठरतेय धोकेदायक !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ मे २६ शनिवार
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर किनगाव गावालगत असलेल्या लव्हाळ नाल्यावरील पुलावर काही महिन्यांपूर्वीच कठडे बसविण्यात आले आहे मात्र पुलाच्या उत्तर व दक्षिण बाजूला आठ ते दहा फुटाची जागा रिकामी सोडण्यात आलेली आहे.परिणामी सदरील जागा हि मोठी धोकेदायक बनली असून यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या पुलावर रिकाम्या असलेल्या जागी कठडे बसवून वाहतुकीसाठी हा पूल सुरक्षित करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर किनगाव गावालगत असलेल्या लव्हाळ नाल्यावरील पुलावर काही महिन्यांपूर्वीच कठडे बसविण्यात आले आहे मात्र पुलाच्या उत्तर व दक्षिण बाजूला आठ ते दहा फुटाची जागा रिकामी सोडण्यात आलेली असून लव्हाळ नाल्यावर बनवण्यात आलेला हा फुल खूप जुना आहे व या पुलापासून नाल्याची खोली ४० ते ५० फूट इतकी आहे.पावसाळ्यात या पुलावर पाणीही मोठ्या प्रमाणात साचते व वाहनधारकांना पावसाळ्यात या पुलावरून वाहन चालवताना खूप सावधगिरी बाळगावी लागते म्हणून या पुलावर पावसाळ्या आधीच पाणी निघण्याचा मार्गही मोकळा करणे गरजेचे आहे.सदरहू पुलाच्या उत्तर व दक्षिण बाजूस कठळेविना असलेल्या रिकाम्या जागेतील मोठे खड्डे धोकेदायक आहेत.तसेच बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर दिवस रात्र लहान मोठ्या व अवजड वाहनांची ये जा सुरू असते व या रिकाम्या जागेत मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या पुलावर रिकाम्या असलेल्या जागी कठडे बसवून वाहतुकीसाठी हा पूल सुरक्षित करावा अशी मागणी वाहनधारकांसह किनगाव परिसरातील नागरिक करीत आहे.