याबाबत कार्यारंभ आदेश ९ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२८ चार देण्यात आला आहे.गुजरात इन्फोटेक लिमिटेड अहमदाबाद यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे नऊ सेतू सुविधा केंद्र(आपले सरकार सेवा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालय देवगड,वैभववाडी,कणकवली,मालवण,कुडाळ, सावंतवाडी,वेंगुर्ला,दोडामार्ग हे नागरी सुविधा केंद्राचे कामकाज सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर आदेशान्वये मंजुरी देण्यात येत आहे असे जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या आदेशात म्हटले आहे.सेतू सुविधा केंद्र चालविताना भागधारक व महाऑनलाईन यांना राज्य सेतू सुविधा १ रूपया,जिल्हा सेतू सुविधा ५ रूपये,महाऑनलाईन ४ रूपये तर गुजरात कंपनी निविदा धारक १० रूपये वर्गीकरण करण्याला या कंपनीने स्विकृती दिली आहे असे या कार्यारंभ आदेशात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी म्हटले आहे.या सेतू सुविधा केंद्रात ४ किंवा ५ कर्मचारी आहेत.जिल्ह्यातील ९ केंद्रात ४० कर्मचारी असतील असे सांगण्यात आले आहे.
कंपनी गुजरातची असलीतरी संबंधित महाराष्ट्रातील ?
निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे दरम्यान निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले,याबाबत पाच निविदा प्राप्त झाल्या होत्या.सन २०२२ पासून निविदा प्रक्रिया सुरू झाली होती व ती सन २०२४ मध्ये मंजूर झाली.कंपनी गुजरात इन्फोटेक लि.अहमदाबाद या नावाने असलीतरी या कंपनीचे संबंधित महाराष्ट्रातील आहेत व या कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तहसीलदार कार्यालयात तर पुणे जिल्हात सेवा सुरू केली आहे तसेच सध्या सेतू सुविधा केंद्रात असलेल्या कर्मचाऱ्यांकरवी ते काम पुढे सुरू ठेवतील.सेतू सुविधा केंद्रांची मुदत २०२२ मध्ये संपली होती.पुर्वीच्या निविदा धारकांना दोन वर्ष मुदतवाढ मिळाली होती असे त्यांनी सांगितले.