यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० फेब्रुवारी २६ शुक्रवार
येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी .महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत आनंददायी व भावनिक वातावरणात पार पडला या निरोप संमारभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शरद जिवराम महाजन यांनी भूषवले तसेच या प्रसंगी या शिक्षण मंडळाचे असिस्टंट सेक्रेटरी ए .बी .महाजन,आ.य.टी. आय चे प्राचार्य गिरीश वाघुळदे सेमीमाध्यमा च्या प्राचार्या सौ रंजना महाजन तसेच इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे प्रवीण झोपे सर पर्यवेक्षिका श्री राजश्री लोखंडे मॅडम व सौ गौरी भिरूड यांनी उपस्थिती दिली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व स्वर्गीय जे.टी महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी शाळेच्या संपूर्ण आठवणींना उजाळण्यात शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करत व शिक्षकाने दिलेल्या संस्कार वर्तणूक चांगले विचार व येणाऱ्या व्यक्ती भवितव्यासाठी केलेले मार्गदर्शन यांची कृतज्ञ बाळगून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सर्व शिक्षक भावना विभोर झाले तर शाळेतील गुरूजनांच्या आठवणीने विद्यार्थ्यांचे डोळे अश्रुनी पाणावले.
यानंतर शाळेची आठवण म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतर्फे मानेवर यांच्या हस्ते भेट देण्यात आली शाळेच्या शिक्षकांसह शिक्षीका येवले यांनी विद्यार्थ्यांना आपल्या गोष्टींची आवड आहे त्यात करिअर बनवण्याचा सल्ला दिला नंतर शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाचे भान ठेवून स्वतःचे स्किल डेव्हलप करावे असे मार्गदर्शन केले.तर सेक्रेटरी ए.बी.महाजन यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अष्ट सूत्र सांगून आपल्या साठी शिक्षणा बरोबरच आपला सर्वांगीण विकास किती महत्त्वाचा असतो सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आ.य.टी.आय प्राचार्य गिरीश वाघुळदे सरांनी स्वामी विवेकानंदाप्रमाणे ध्येयनिश्चिती करा असे मार्गदर्शन केले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष शरद महाजन यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करा परंतु ते उत्कृष्ट पद्धतीने करा तरच त्या प्रयत्नांना मूल प्राप्त होईल तसेच आई-वडिलांनी जे स्वप्न तुमच्या प्रगती साठी बघितले आहे.ते सर्व स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची राहील असे म्हणत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले तसेच सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रकमी बक्षीस जाहीर केले.त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा पाटील यांनी केले.