Just another WordPress site

यावल महाविद्यालय मार्फत व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांंच्या सहभागात जनजागृती रॅली संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ मार्च २६ शनिवार

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया मार्फत यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथे व्यसनमुक्ती जागर कार्यक्रमांतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती रॅली प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आली.”विकसित भारत का मंत्र,भारत हो नसे से स्वतंत्र” या थीम अंतर्गत सदर रॅली घेण्यात आली.

ग्रामीण भागात तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. तंबाखूजन्य पदार्थ तसेच अमली पदार्थ यांच्या सेवनाने शरीरावर दुष्परिणाम होतात त्यामुळे असाध्य आजार निर्माण होऊन त्याचा परिणाम कुटुंब व मुला बाळांवर होतात.व्यसनाधीनते मुळे सदर व्यक्तीची प्रतिमा समाजात मलिन होते.यासाठी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने जनजागृती रॅली काढण्यात आली.सदर रॅली गावातील मुख्य गल्लीतून विठ्ठल मंदिर मार्गे जिल्हा परिषद शाळेजवळ घेण्यात आली.सदर रॅलीचा समारोप जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आला.रॅलीमध्ये विविध घोषणा देण्यात आल्या
तसेच बोरवल गावातील आदिवासी वस्ती पाड्यावर जनजागृती व समुपदेशन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहाय्याने करण्यात आले .
रॅलीचे आयोजन यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक डॉ.आर.डी. पवार प्रा.आर.एस.सिरसाठ,प्रा.पी.व्ही.मोरे,भैरवी चौधरी,तृप्ती पाटील,अक्षय पाटील,शुभांगी अडकमोल आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.