Just another WordPress site

यावल तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा कळस !! वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन आंदोलनाच्या पावित्र्यात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ मार्च २६ बुधवार

यावल पूर्व वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन आक्रमक झाली आहे.

दरम्यान भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांना निवेदन देत अवैध वृक्षतोड तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१३ एप्रिल २६ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय यावल पूर्व समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व यासाठी आवश्यक परवानगीची मागणीही करण्यात आली आहे.वेळेत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा भीम आर्मीच्या वतीने देण्यात आला आहे.सदरहू सदरील अवैद्य वृक्षतोडीमुळे परिसरातील वातावरण तापले असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.