Just another WordPress site

कदम अकॅडमीत एसओएफ ऑलिंपियाड बक्षीस समारंभ उत्साहात !!

सनी पटेल,पोलीस नायक

बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०६ एप्रिल २६ सोमवार

कदम अकॅडमीमध्ये एसओएफ ऑलिंपियाड परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन (SOF) यांच्यावतीने इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिंपियाड,नॅशनल सायन्स ऑलिंपियाड आणि इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड या परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षांचे निकाल डिसेंबरमध्ये जाहीर झाले.या निकालात कदम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.यशराज शिवाजी तांबवे (झोनल रँक ४),वरद अनिल जराड (झोनल रँक १३) आणि संग्राम काशिनाथ आटोळे (झोनल रँक १८) यांनी झोनल स्तरावर उल्लेखनीय स्थान मिळवले या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक रु. ५,०००, गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

सायन्स ऑलिंपियाडमध्ये प्रणित वाघमोडे,राजकन्या पांडेकर,समृद्धी जगताप,तनुजा खोसे,यशवंत माकोने,ओमकार गरड,कार्तिकी मोरे,ओम थोरात,यश गायकवाड, आदित्य भामे,श्रावणी देशमुख,भक्ती घिगे,नील इंदलकर,आर्यन पवार आणि भक्ती काळुखे यांनी ‘गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स’ मिळवून यश संपादन केले.तसेच मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाडमध्ये अक्षय खोत,समर्थ सायकर,संग्राम आटोळे,तनुजा खोसे,समृद्धी जगताप,अथर्व सुळ,वेदांत जाधव,प्रीती तांबे,विकास बीचुकले,साईराज लोखंडे,सोनाक्षी काळे,श्रावणी देशमुख,वैष्णवी घाटे,महादेव पवार,तेजश्री जराड,कार्तिकी थोरात,मयुरी हिवरे,प्रथमेश शिंदे,सर्वेद मोकाशी आणि प्रवीण खेडकर यांनी ‘गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स’ पटकावले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अकॅडमीचे मुख्य संचालक जयसिंगराव कदम,कल्पना कदम,डॉ.सुविराज कदम,डॉ.साक्षी कदम तसेच व्यवस्थापनातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यंदाच्या शैक्षणिक वर्षातही जनरल नॉलेज,इंग्लिश,सायन्स,मॅथेमॅटिक्स,कॉम्प्युटर सायन्स,सोशल स्टडीज आणि हिंदी या विषयांमध्ये विविध ऑलिंपियाड परीक्षा राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुविराज कदम यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.