Just another WordPress site

सातपुडा पर्वत रांगेतील जामुनझिरा आदिवासी पाड्यालगत बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ एप्रिल २६ रविवार

येथून जवळच सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या जामुनझिरा या आदिवासी वस्ती पाडवरच्या गावठाण भागात मोहराळे येथील ट्रॅक्टर चालकाला बिबट्याचे दर्शन झाल्याचा प्रकार आज रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडला.सदरहू बिबट्या दिसुन आल्याच्या घटनेमुळे या ठीकाणी राहणारे आदिवासी कुटुंब व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

काल रात्री दि.१८ एप्रील रोजी मोहराळे येथील गजानन रामकृष्ण पाटील हे शेतकरी त्यांची शेतीची कामे करून पाच ते सहा मजुरांसह जामुन झिरा गावठाणा पासून मोहराळे येथे येत असताना रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान बिबट्या आढळून आला.ट्रॅक्टरची वेग वाढविल्यामुळे झालेल्या प्रखर लाईटच्या प्रकाशामुळे गोंधळलेल्या बिबट्याने पळ काढला.सद्या तीव्र तापमानामुळे व सातपुडा पर्वतात वृक्षतोड माफियाकडून मोठया प्रमाणावर वृक्षतोड होत असल्पामुळे वन्य हिंस्र प्राणी आता शहरी परिसर व गावाकडे वळत आहे व याचा परिणाम सामान्य नागरिकांवर व शेतमजुरांवर ,शेतकऱ्यांवर होत आहे.बिबट्या दिसुन आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.शेतात कामे कशी करावीत हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे.यावेळी बिबटया दिसुन आल्या संदर्भातील माहीती मोहराळे येथील सामाजिक कार्यकर्ते लहू पाटील व नागरिकांनी तात्काळ वनविभागा कडे भ्रमणध्वनीवरून कळविल्या नंतर या ठिकाणी उपस्थित राहून वन विभागाच्या कर्मचारी यांनी पगमार्गाची तपासणी केल्यावर सदर प्राणी हा बिबट्याच असल्याचे वनविभागाचे वनपाल एस पी हेंदी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.