Just another WordPress site

गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा !! संत महातम्यांसह आमदार अमोल जावळे यांची मागणी !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी):-

दि.२७ एप्रिल २६ सोमवार

देशभरात गौसंरक्षण आणि गोमातेच्या सन्मानाच्या मागण्यांना नव्याने जोर येत असतांना यावल येथे आज दि.२७ एप्रिल सोमवार रोजी संत,जनप्रतिनिधी आणि गौरक्षकांच्या उपस्थितीत गौमाता ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याची मागणी करत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले.तसेच परिसरातील सुरू असलेले कत्तलखाने तातडीने बंद करण्यात यावेत अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

प्रसंगी महा मंडलेश्वर जर्नादन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात्मक निवेदन मोहिमेत रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.देशव्यापी स्तरावर आज २७ एप्रिल रोजी तहसील पातळीवर ही निवेदन मोहीम राबविण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून यावलमध्येही हे निवेदन सादर करण्यात आले.आमदार अमोल जावळे यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवत शासनापर्यंत जनभावना पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.गोसंवर्धन,पर्यावरण संतुलन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी गोवंशाचा असलेला संबंध लक्षात घेता या मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा असे त्यांनी नमूद केले.आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.तहसील कार्यालय परिसरात निवेदन सादर करताना घोषणाबाजी करण्यात आली.गौरक्षक आणि संतसमाजाच्या उपस्थितीमुळे वातावरण धार्मिक आणि आंदोलनात्मक रंगात रंगले होते.निवेदन स्वीकारल्यानंतर प्रशासनाकडून ते शासनापर्यंत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.