Just another WordPress site

पुरस्कारांचा बादशहा डॉ डिगंबर तायडे पंजाब सरकारच्या “भारत विभूषण” पुरस्काराने सन्मानित !!

बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक

मुख्य संपादक,दि.१२ मे २६ मंगळवार

भारत विभूषण पुरस्कार हा आदर,प्रेरणा आणि राष्ट्रअभिमानाचे प्रतीक म्हणून कायम असून जो व्यक्ती आणि संस्थांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यास प्रोत्साहित करतो अशा व्यक्तींना “भारत विभूषण पुरस्कार २०२६” देऊन सन्मानित करण्यात येते.तद्नुसार पंजाब सरकारचा प्रतिष्ठेचा असा “भारत विभूषण पुरस्कार २०२६” हा पुरस्कार आपल्या कतृत्वाने व अविरत कार्याने अख्ख्या जगाला भुरळ घालणारे पुरस्कारांचा बादशहा डॉ डिगंबर तायडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.सदरील पुरस्कार वितरण सोहळा चंदीगडच्या सेक्टर १ येथील पंजाब विधानसभेच्या प्रादेशिक सभागृहात अत्यंत सन्मानाने आणि भव्यतेने नुकताच पार पडला.प्रसंगी विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्यात देशभरातील नामवंत व्यक्ती,कर्तृत्ववान व्यक्ती आणि मान्यवर यांना आमंत्रित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला पंजाब विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतारसिंग संधवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रसंगी विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतारसिंग संधवान यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवीत आपल्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांना स्फूर्ती दिली.

दरम्यान डॉ.अतुल कुमार शर्मा अध्यक्ष इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिफॉर्म्स अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट ISRHE आणि सुश्री रेशू गुप्ता सचिव,ISRHE यांच्याद्वारे या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.सदरहू या दोन्ही मान्यवरांनी प्रमुख पाहुण्यांसोबत व्यासपीठ सामायिक केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.तसेच या कार्यक्रमाची प्रतिष्ठा आणखी वाढवत पंजाब विधानसभेचे उपसभापती सरदार जयकृष्णसिंग रोरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पुरस्कार विजेत्यांना आपल्या उपस्थितीने आणि प्रोत्साहनपर शब्दांनी प्रोत्साहित केले.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब विधानसभा सचिव राम लोक खटाना,अध्यक्षांचे सचिव सरदार सुरिंदर सिंग मोती, व्यवस्थापकीय संचालक साहिल लुथरा, विजयन त्रिशूल डिफेन्स सोल्युशन्स प्रा.लि.दिल्ली,डॉ.अभिषेक गिलारा,विदेशिक सदैव ज्वेल्स म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली ज्यामुळे देशभक्ती आणि अभिमानाची भावना जागृत झाली.प्रसंगी निवेदिका कुमारी गौरी शर्मा आणि कुमारी गीत शर्मा यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत आणि आकर्षक राहिला.या सोहळ्यादरम्यान शिक्षण,आरोग्यसेवा,समाजसेवा,उद्योग,संशोधन आणि लोकसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना राष्ट्रउभारणीतील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

यावेळी आपल्या भाषणात प्रमुख पाहुण्यांनी संपूर्ण भारतात उत्कृष्टतेला मान्यता देण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या ISRHE च्या प्रयत्नांची प्रशंसा केली.समाजाच्या विकासात निस्वार्थपणे योगदान देणाऱ्या आणि आपल्या कार्याद्वारे इतरांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली ज्यामुळे एका यशस्वी आणि संस्मरणीय सोहळ्याचा आदरपूर्वक आणि देशभक्तीपूर्ण समारोप झाला.प्रसंगी बिक्रमजीत सिंग यांना एआय आणि आयओटी नेतृत्वातील जागतिक उत्कृष्टता,डॉ.शिवचरण सिंग यांना एरोस्पेस आणि एव्हिएशन थॉट लीडरशिप,डॉ.डिगंबर सीताराम तायडे यांना शाश्वत शहरी विकासातील उत्कृष्टता,डॉ.अलका राणी यांना शिक्षण आणि शैक्षणिक नेतृत्वातील उत्कृष्टता,कुमारी शिवकान कौर यांना पंजाबी पारंपरिक नृत्यातील छोटी तारा तसेच डॉ.ब्रिजदुलाल चक्रवर्ती यांना अभियांत्रिकी उत्पादन,औद्योगिक प्रशासन आणि सामाजिक योगदानातील दूरदर्शीपणा यानुसार “भारत विभूषण पुरस्कार २०२६” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.दरम्यान डॉ डिगंबर तायडे यांच्या जीवनाची सुरुवात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातून झाली असून कठोर परिश्रमानंतर नोकरी निमित्ताने डोंबिवली (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गायन,समाजसेवा व विविध सेवांच्या माध्यमातून अथक परिश्रम व मेहनत घेत पुरस्कार जिकंण्याच्या शर्यतीत डॉ डिगंबर तायडे हे प्रथम स्थानावर आहेत.दरम्यान त्यांची पुरस्कार जिकंण्याची भूक दिवसेंदिवस वाढत आहे हे विशेष !.सदरहू डॉ डिगंबर तायडे यांना प्रतिष्ठित असलेला पंजाब सरकारचा “भारत विभूषण पुरस्कार २०२६” पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.