Just another WordPress site

यावल शहरातील एसआयआर अंतर्गत मतदारांची नावे कमी करणाऱ्या बिएलओवर कारवाई करण्याची भाजपाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० मे २६ शनिवार

एसआयआर प्रक्रिया सुरू असतांना मतदारांची नावे कमी करणाऱ्या बिएलओ विरूद्ध कारवाई संदर्भात भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भुषण फेगडे यांच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्याकडे तक्रार निवेदन देण्यात आले.

या संदर्भात तहसीलदार यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील आपल्या कार्यक्षेत्रातील काही मतदार केन्द्रांवर एसआयआर (SpeciaI intensive Revision) प्रक्रीया सुरू असतांना काही बिएलओ मार्फत अनेक मतदारांची नावे कोणतीही पुर्व सुचना अथवा पडताळणी न करता मतदार यादीतुन कमी करण्यात आलेली आहे.सदरच्या प्रकारामुळे यावल शहरातील सर्वसामान्य नागरीकांच्या मतदार यादीतुन कमी करण्यात आल्यामुळे त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून लोकशाहीतील मतदारांच्या मतदानावर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.दरम्यान अनेक नागरीक त्या पत्यावर प्रत्यक्ष वास्तव्यास असतांना त्यांची नावे कमी करण्यात आल्याचे तक्रार एका निवेदना केली आहे.याबाबत प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधीत मतदारांची नावे पुनश्च त्या मतदार यादीत समाविष्ठ करण्यात यावेत व संबंधीत बिएलओ यांनी नियमबहाय पध्दीतीने केले असल्यास त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.यावेळी भाजप यावल तालुका उपाध्यक्ष भुषण फेगडे,विर येवले,नितिन बारी,हेमंत चौधरी,कोमल इंगळे व आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.