Just another WordPress site

ना गिरीष महाजन यांची समाज माध्यमावर प्रतिमा मलीन करण्याच्या हेतुने आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत भाजपाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जून २६ रविवार

राज्याचे जलसंपदा मंत्री ना . गिरीषभाऊ महाजन यांची सर्व सामान्य जनमासातप्रतिमा मलीन करण्याच्या समाज माध्यावर हेतु पुरस्कर पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई व्हावी या मागणी साठी रावेर यावल चे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावित यांची भेट घेत निवेदन सादर केले .

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना .गिरीषभाऊ महाजन यांच्या विरूद्ध सोशल मिडीयावर (फेसबुक / ईन्स्टाग्राम / Twitter / WhatsApp ) या समाज वाहीन्यांच्या साईटवर हेतूपुरस्कर फोटो व कमेंट करून प्रतिमा मलीन करणाऱ्या कृतीमुळे जनमानसात संभ्रम निर्माण करणार्या व्याक्ति विरूद्ध तात्काळ गुन्हा दाखल करीत कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या असंस्य कार्यकर्त्यांच्या शिष्ठ मंडळाने यावल येथे अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावित यांची भेट घेत निवेदन दिले या वेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती उज्जैनसिंग राजपुत , भाजपा चे तालुका अध्यक्ष सागर कोळी, नगरसेवक उमेश फेगडे, हेमराज उर्फ बाळू फेगडे ,भाजपा चे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर तायडे , भरत पाटील,डॉ कुंदन फेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे,यावल नगर पालीकेच्या गटनेत्या नंदा महाजन,नगरसेवक योगेश चौधरी ,नगरसेविका सविता नन्नवरे,डॉ निलेश गडे नगरसेविका कल्पना दिलीप वाणी,भुषण फेगडे, व्यंकटेश बारी,बबलु घारु, विलास चौधरी ,संदिप सोनवणे,मुकेश कोळी रितेश बारी,दिलीप वाणी , उज्वल कानडे , कोमल इंगळे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.