यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० जुलै २६ सोमवार
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या हरिपुरा धरणात यावल येथील महाजन गल्ली राहणारा सतरा वर्षीय जयेश फेगडे या तरुणाचा काल दि.१९ जुलै रविवार रोजी धरणात बुडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली असुन तरुणाच्या या दुर्दैवी मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,येथील महाजन गल्लीत राहणारे संजय सिताराम फेगडे यांचा मुलगा नामे जयेश फेगडे वय १७ वर्ष हा काल दि.१९ जुलै रविवार रोजी त्याचे चुलत भाऊ व वहिनी यांच्यासोबत हरीपुरा धरण परिसरातील नैसर्गीक सौंदर्यास पाहण्यासाठी गेला होता.दरम्यान दुपारच्या वेळेस धरणाच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यावेळी तरूणाचा मृतदेह या ठीकाणी हजर असलेल्या आदिवासी पावरा समाजाच्या तरुणाने धरणाच्या पाण्यातुन बाहेर काढले.सदरहू जयेश फेगडे हा यावल येथील होमगार्ड संजय सिताराम फेगडे यांचा एकुलता एक मुलगा होता.जयेश फेगडे या तरुणाच्या अशा दुदैवी मृत्युमुळे फेगडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हालहाल व्यक्त करण्यात येत आहे.