यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ ऑगस्ट २६ मंगळवार
येथील शहरातील यावल-भुसावळ या राज्य मार्गावरील भुसावळ टी पाँईट ते जुना भुसावळ नाक्यापर्यंतच्या वारंवार या रस्त्याची ठीकठीकाणी अपघाताला आमत्रंण देणारी खड्डेमय अवस्था झाली असून या मार्गावरील अनेक अपघात झाले असले तरी यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा अशी मागणी वाहनधारक व नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.
यावल शहरातील वर्दळीचे भुसावळ टी पॉईंट ते जुना भुसावळ नाका पर्यंतच्या राज्य महामार्गावरील सुमारे एक किलोमिटर रस्त्यावर ठीकठिकाणी मोठमोठी खड्डे निर्माण झाली असुन पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी भरल्याने वाहन चालकाचा अंदाज चुकुन अपघात होतांना दिसत आहे.याच मार्गावर मागील वर्षी दुचाकीचा अपघात होवुन या महिला गंभीर जखमी होवुन मरण पावली असुन ईतर वाहनांचे खड्डयांचे अंदाज चुकत असल्याने अपघात होत असतात.यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वारंवार तात्पुरती नावाला खड्डे बुजुन दुरूस्ती केली जाते व काही दिवसाने हा रस्ता पुन्हा खड्डेमय होवुन वाहनांच्या अपघातांना सुरूवात होते.लोकप्रतिनिधी यांनी शहरातुन जाणाऱ्या या वर्दळीच्या अपघातास आमंत्रण देणाऱ्या मार्गास नव्याने उभारणी करावी अशी मागणी होत आहे.