Just another WordPress site

तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील?

वडेट्टीवार यांचा मुनगंटीवार यांना खोचक टोला

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. शिवरायांची ‘जगदंबा तलवार’ परत मिळवण्यासाठी सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार आहेत.भाजपचे नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.मुनगंटीवार यांच्या या भूमिकेवर माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र चिमटे काढले आहेत.तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक सल्ला वडेट्टीवारांनी दिला आहे.”जगदंबा तलवार’ ही आमच्या अस्मितेचे प्रतिक आहे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली आहे.ही तलवार महाराष्ट्राला परत करावी असे पत्र आम्ही केंद्राला पाठवले आहे तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही आम्ही विनंती करत आहोत असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

जगदंबा तलवार परत आणण्याचा मुनगंटीवार यांच्या विधानावर वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.वडेट्टीवार म्हणाले की,जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंद होईल मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याने हजारो बेरोजगारांचे हातचे काम गेले आहे. महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले.तलवार आणत असताना तलवारी सोबत उद्योगही आणा परिणामी बेरोजगाराच्या हातांना काम मिळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.उद्योग गेलेत,रोजगार बुडालेत,महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनेचे राजकारण करण्यासाठी जगदंबा तलवारीच्या विषय पुढे केला तुमचे राजकारण महाराष्ट्रातील तरुणांना कळत आहे.तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील असे वडेट्टीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.