मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,” असे मोठे विधान केले आहे ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.ते आज दि.१ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.राज ठाकरे म्हणाले,“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही.पोर्तुगीज,मोघल,ब्रिटिशांकडून यागोष्टी आल्या.महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत त्यात ज्या गोष्टी सापडतात त्या आपल्यासमोर आहेत.या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले,पत्रच नाहीत त्यामुळे यातून काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहचावा लागतो.त्यामुळे प्रतापराव गुजरांबरोबर कोण सहा लोक होते याला काही अर्थच उरलेला नाही.सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही.फक्त इतिहासाला धक्का लागणार नाही हे बघण गरजेचे आहे अशाप्रकारे शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे असे आक्रमक मत राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरे इतिहासावर बोलताना म्हणाले,जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे.सध्या जातीतून इतिहास पाहण्याचे पेव फुटले आहे.ठराविक मुठभर लोकच असे करत आहेत त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.’वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सहा जणांची नावे टाकली.मग कोणीतरी बोलले ही सहा नावे नाहीत,तर ही सहा नावे आहेत.गंमत बघा,मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतुहल वाटते तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो.आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे,समजून घेतले पाहिजे असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.राज ठाकरे पुढे म्हणाले,मध्यंतरी मी गजानन मेहंदळे यांना भेटलो.मी त्यांना विचारले की,वेडात मराठे वीर दौडले सातबाबत कोणी ही सहा नावे सांगत आहे,तर कोणी ती नावे सांगत आहेत.तुमचे म्हणणे काय?मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो.ते मला म्हणाले की,गजाननराव बरोबर बोलत आहेत.गजाननराव इतिहासाचे दाखले आणि संदर्भ यांचे ते अभ्यासक आहेत.मी मेहंदळे सरांना हे काय आहे असे विचारले.ते शांत बसले आणि म्हणाले की,जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते सात होते की आठ होते की दहा होते हे कोठेही लिहिलेले नाही.प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही.आतापर्यंत आपण जी नाव ऐकली ती सर्व काल्पनिक नाव आहेत असे राज ठाकरेंनी म्हटले.