यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जंगलातुन शहराकडे वाढलेला वन्य प्राण्यांचा वावर व त्या वन्य प्राण्यांकडून नागरीकांवर होणारे हल्ले या संदर्भात तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावातील राहणाऱ्या आदीवासी बांधवांसाठी वनविभागाच्या वतीने प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वन्यजीव संघर्ष जनजागृती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यानिमित्त सातपुडा पर्वतातील यावल तालुक्यातील रूईखेडा व रावेर तालुक्यातील अंधारमळी या ठिकाणी वन विभागाच्या वतीने वन्यजीव संघर्ष संदर्भात मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रम यावल जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे,वन्यजीव संघर्ष जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व व्हाईल्ड लॉन्डस कंझर्वेशन फाउंडेशन नागपुरचे अजिंक्य भांबूरकर, नागपुरचे व्हॉलेन्टीअर विजु गजमिये,यावल पुर्व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी अतिदुर्गम वनक्षेत्रातील गावात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना वन्यप्राणी यांच्या हल्ल्याच्या घटना व नागरीकांनी घ्यावयाची दक्षता या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच वनकर्मचारी यांना वन्यप्राणी हाताळणे,प्राण्यांचे संरक्षण व देखभाल करणे,नैसर्गीक अधिवासात सोडणे याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवुन मार्गदर्शन करण्यात आले.सदरील जनजागृतीपर आयोजीत कार्यशाळेला अंधारमळीचे पोलीस पाटील रमजान तडवी,वनसंरक्षण समिती अध्यक्ष,पदाधिकारी,ग्राम पंचायत सदस्य व प्राथमिक माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मोहमांडलीचे प्रा.कुमावत सर व त्यांचे सर्व सहकारी तसेच वनपाल अतुल तायडे,रविन्द्र तायडे,रज्जाक तडवी,वनरक्षक गोवर्धन डोंगरे,कृष्णा शेळके,गणेश चौधरी,तुकाराम लवटे,प्रकाश बारेला, जिवन नागरगोजे,नंदलाल वंजारी यांनी ही वन्यप्राणी संघर्ष जनजागृती कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.