Just another WordPress site

“एकनाथ खडसे यांनी जमिनीमध्ये तोंड काळे केले नसते तर त्यांना काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती” देवेंद्र फडणवीस यांची टीका

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.२७ जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना जळगावात काळे झेंडे दाखवले जातील असा इशारा दिला असून यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.एकनाथ खडसे यांना नवीन मालक मिळाला आहे.नवीन मालक जसे सांगतील त्याप्रमाणे एकनाथ खडसे वागतात अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.’एकनाथ खडसे यांनी जमिनीमध्ये तोंड काळे केले नसते तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असून याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की,कुणाचीही धरपकड करण्याची आवश्यकता नसून काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे?खरे म्हणजे एकनाथ खडसेंचे असे झाले आहे की त्यांना नवीन मालक मिळाला आहे त्या नवीन मालकाने सांगितले तसे एकनाथ खडसे वागतात तसेच एकनाथ खडसेंनी जमिनीमध्ये तोंड काळे केले नसते तर काळे झेंडे दाखवायची वेळ त्यांच्यावर आली नसती ते आमच्या परिवारात राहिले असते त्यांना नवीन मालकाकडे जाण्याचीही गरज नव्हती.आम्ही अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे लोक नाहीत असे काळे झेंडे कितीही दाखवले तरी काही फरक पडणार नाही.आम्ही जनतेसाठी काम करत आहोत.जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही जळगावला आलो आहोत व जळगावची जनता आमच्याबरोबर आहे असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.